मनसे सोडण्याबाबत आमदार शरद सोनावणे यांची प्रतिक्रिया!

मनसे सोडण्याबाबत आमदार शरद सोनावणे यांची प्रतिक्रिया!

मुंबई – मनसेचे जुन्नर येथील एकमेव आमदार असलेले शरद सोनावणे हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली असून मी मनसेतच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मी नाराज नसून शिवसेनेकडून अद्याप कोणताच प्रस्ताव आला नसल्याही  शरद सोनावणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सोनावणे हे मुळचे शिवसैनिक असून निवडणूक लढवण्यासाठी पक्षानं संधी दिली नसल्यामुळे  २०१४च्या निवडणुकीत मनसेच्या तिकीटाद्वारे ते आमदार म्हणून निवडणून आले. परंतु आता ते पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु शिवसेनेची नव्याने मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना स्वगृही बोलवण्याबाबत बैठका सुरू आहेत. अशा वातावरणात मी शिवसेनेत जात असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र माझ्यापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS