नाशिक – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत आहे. भाजपला धक्का देण्यासाठी आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील कोथरूड मतदारसंघात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुढे आघाडीनं आव्हान निर्माण केलं आहे. मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
कोथरुड हा युतीचा पारंपरिक मतदारसंघ आहे. येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी होत असत. मात्र गेल्या विधानसभेला भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. याठिकाणी सतत भाजप-शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.भाजपच्या दृष्टीने सुरक्षित मतदारसंघ असल्याने थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. परंतु या मतदारसंघातील विरोधक एकत्र आले आहेत.
त्यानंतर आता भाजपला धक्का देण्यासाठी आणखी एका मतदारसंघात मनसे आघाडीची छुपी युती पहायला मिळत आहे. नाशिक पूर्वमधून मनसेचे अधिकृत उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली असून भाजपचे बंडखोर आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना मुर्तडक यांनी पाठिंबा दिला आहे.भाजपच्या विरोधात काम करणार असूम पूर्वतयारी नव्हती म्हणून माघार घेतली असल्याचं मुर्तडक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप उमेदवार राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्यात ही दुरंगी लढत होणार आहे.
COMMENTS