राष्ट्रवादी आणि मनसेच्या ‘या’ दोन युवा नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा !

राष्ट्रवादी आणि मनसेच्या ‘या’ दोन युवा नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन युवा नेत्यांची भेट आज झाली.त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकर् आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे दोघे मुंबईत लंचसाठी एकत्र आले होते. मुंबईतल्या फिनिक्स मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या इंडिगो हॉटेलमध्ये या दोघांनी दुपारचं जेवण केलं. यावेळी हे दोघेजण सव्वा तास एकत्र होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलांनी सोबत येऊन साधलेला संवाद हा चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. परंतु या दोघांनीही विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून अमित ठाकरे हे राजकारणामध्ये सक्रीय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी राज ठाकरेंच्या सभेला आवर्जून हजेरी लावली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळून ते राज ठाकरेंची सभा, त्या सभेला मिळणारा प्रतिसाद या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करत होते. त्याचप्रमाणे शरद पवारांचे नातू रोहित पवार हेदेखील सतत त्यांच्यासोबत असतात. शरद पवारांनी महाराष्ट्रातला दुष्काळ दौरा केला तेव्हाही रोहित पवार त्यांच्यासोबत होते. तसेच ते विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची झालेली आजची भेट महत्तेवपूर्ण असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS