मनसेसाठी ‘हा’ लोकसभा मतदारसंघ सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी ?

मनसेसाठी ‘हा’ लोकसभा मतदारसंघ सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी ?

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाआडीला पाठिंबा दिला तर  मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीची तयारी दर्शवली असल्याची माहितू आहे. अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या बैठकीदरम्यान याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. परंतु काँग्रेससोबत चर्चा करूनच निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूनिकेकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचे सूत्र जाहीर केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेला

कल्याण-डोंबिवलीची जागा दिली जाणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS