मुंबई: अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमेनुसार अॅमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसवर धडक दिली होती. मनसेकडून अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, असा इशारा मनसेने दिली होती.
COMMENTS