…त्यामुळे मनसेनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार !

…त्यामुळे मनसेनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार !

मुंबई – राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात मनसे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात मराठी शिकणे बंधनकारक राहील. सर्वच शिक्षण मंडळाच्या शाळांना मराठी भाषा शिकवावीच लागेल. राज्यातील सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय मंडळांच्या शाळांमध्येही मराठी भाषा विषय सक्तीचा आणि बंधनकारक करण्यात येईल. यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल करून कठोर कायदा करण्यात येईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. त्यामुळे मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.तसेच मुख्यंत्र्यांनी कायदेशीर तरतूद करण्याचेही मान्य केलं हे ही स्वागतार्ह आहे, असं ट्वीट शिदोरे यांनी केलं आहे.तसेच प्रत्येक शाळेत याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं आपली जबाबदारी असल्याचं शिदोरे यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

COMMENTS