मुंबई- खड्डेमुक्तीसाठी मनसे चांगलीच आक्रमक झालेली दिसतेय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी थेट मंत्रालयाच्या मुख्य गेटवरून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर कुदळने खड्डा खोदून आंदोलन केलंय. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या आंदोलनाकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. .
संपूर्ण महाराष्ट्रातल्या खड्डेयुक्त रस्त्यांचा जाहीर निषेध आणि सर्वसामान्यां जो खड्ड्यांचा त्रास होतो तोचं त्रास सत्ताधारी, निष्क्रिय युती सरकार मधील मंत्र्यांनीही व्हावा यासाठी मनसैनिकांनी हे आंदोलन करण्यात आलं.
PWDच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मंगळवारी पहाटे थेट मंत्रालयासमोर खड्डे खोदलेत. त्याचसोबत मनसेचे संदीप देशपांडे यांनी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांची पाट थोपटत अभिनंदन केले आहे. मंत्रालय बाहेर ज्यांनी खड्डे केले त्यांना तुम्ही त्वरित अटक करतां, ज्यांनी महाराष्ट्रभर खड्डे करून ठेवले त्यांना कधी अटक करणार ? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी एका व्हिडिओद्वारे उपस्थित केला
राज ठाकरेंचा पाठिंबा
‘माझ्या मनसैनिकांनी केलेलं आंदोलन योग्य आहे. जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर किमान आंदोलन तरी दिसेल’, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
पहा हा व्हिडिओ
COMMENTS