नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय मनसेनं फोडलं !

नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय मनसेनं फोडलं !

मुंबई  कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध वावढत असून मनसेनं आक्रमक भूमिका घेत राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं आहे. ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर मनसैनिकांनी हल्ला चढवला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाची तोडफोड केली आहे. नाणारचा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ठणकावलं आहे.

दरम्यान नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत हे कार्यालय फोडलं आहे.

COMMENTS