मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी, गणेशोत्सवावरुन हल्लाबोल !

मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी, गणेशोत्सवावरुन हल्लाबोल !

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी केली आहे. गणेशोत्सवावरुन ही पोस्टरबाजी करण्यात आली असून अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा, पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा असा टोला मनसेने पोस्टरबाजीद्वारे शिवसेनेला लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्यासंबंधी वक्तव्य केलं होतं. त्यावरुन मनसेनं शिवसेनेला टोला लगावला असून अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा, पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा असं मनसेनं म्हटलं आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेने हायकोर्टाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे. त्यावरुन मनसेनं शिवसेनेला पोस्टरबाजीद्वारे टोला लगावला आहे. तसेच गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गेली ६० ते ७० वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आत्ताच याबाबत तक्रार आली, असे राज ठाकरे यांनी महापालिकेच्या अटींवर टीका केली होती.

COMMENTS