…तर मनसे  पुणे जिल्ह्यातील  विधानसभेच्या “या” 4 मतदारसंघावर सांगू शकते दावा !

…तर मनसे  पुणे जिल्ह्यातील  विधानसभेच्या “या” 4 मतदारसंघावर सांगू शकते दावा !

पुणे – भाजप विरोधात मजबूत आघाडी करण्यासाठी मनसेलाही विरोधी पक्षांच्या आघाडी घ्यावे असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सूर आहे. गेल्या वर्षभरातील शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील संबध अत्यंत सलोख्याचे आणि पूरक राहिलेले आहेत. पुणे, मुंबई नाशिक आणि ठाणे या पट्प्यात मनसेच्या असलेल्या ताकदीचा आघाडीला फायदा होईल असं ऱाष्ट्रवादीला वाटतंय. मात्र उत्तर भारतीय मतांमुळे काँग्रेसला मनसे नको आहे. त्यामुळे मनसे खरोखरच विरोधी आघाडीत येईल की नाही याबबात अजून सस्पेन्स कायम आहे.

मनसे जर विरोधकांच्या आघाडीत आले तर पुणे जिल्ह्याती 21 पैकी 4 जागांवर मनसे दावा करण्याची शक्यता आहे. राज्यात मनसेचा एकमेव आमदार आहे. तो म्हणज्ये जुन्नरमध्ये. शरद सोनवणे मनसेचे आमदार आहेत. त्या ठिकाणी ते दावा करणारच. काही दिवसांपूर्वी जुन्नरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर आमच्यासाठी ही जागा सोडा असं शरद सोनवणे म्हणाले होते. तर दुसरी जागा म्हणज्ये सासवडची. या ठिकाणी मनसेचे बाबा जाधवराव इच्छुक आहेत. या ठिकाणी शिवेसनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे आमदार आहेत. मात्र गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप दुस-या नंबरवर राहिले होते. त्यामुळे ते जागा सोडणार का ते पहावं लागेल. शिवाय राष्ट्रवादीत अनेक गटतट आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ते मदत करत नाहीत. तर मग मनसेच्या उमेदवाराला कसे मदत करणार याबाबत प्रश्नचिन्ह आहेच.

याशिवाय पुणे शहरातील कोथरुड आणि हडपसर या मतदारसंघावर मनसे दावा करु शकते. हडपसरमध्ये तसं पहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच ताकद जास्त आहे. तसचं दावेदारही जास्त आहेत. ते ही जागा मनसेसाठी सोडतील असं वाटत नाही. तरीही मनसेचे पुणे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी या मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केली आहे. विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. टिळेकरांचे विविध प्रताप उघड करण्यात वसंत मोरे यांनी आघाडी घेतली आहे. त्याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

कोथरुड मतदारसंघावरही मनसे दावा करु शकतं. सध्या त्या मतदारसंघात भाजपच्या मेधा कुलकर्णी आमदार आहेत. भाजपला मानणारा मोठा मतदारवर्ग या मतदारसंघात आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद विभागली केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद भाजपच्या तुलनेते कमी आहे. इथून एकास एक उमेदवार दिला तरच भाजपला टक्कर देता येईल अशी स्थिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची कमी नाही. पण तरीही ते मनसेला ही जागा सोडू शकतात. या मतदारसंघात यापूर्ऴी मनसे जिंकलेला नाही. मात्र तुलनेत पक्षानं या मतदारसंघात चांगली लढत दिली आहे.

COMMENTS