मुंबई – मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी आरोप असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि इतर 8 जणांना आज कोर्टाने जामीन मंजुर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजुर करण्यात आलाय.
गेल्या आठवड्यात मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला केला होता. त्याचं संदीप देशपांडे यांनी ट्विरवरुन जाहीर समर्थन करत हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्याच्या मुद्दावरुन काँग्रेस आणि मनसेमध्ये जोरदार वाद सुरू आहे. याच प्रकरणातून दोन वेगवेगळ्या घटनेत मुंबईत मनसेच्या दोन विभाग अध्यक्षांवर फेरीवाल्यांनी हल्ले केले होते. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते.
COMMENTS