मुंबई – मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 नगरसेवकांच्या गटाला मान्यता देणे तसेच संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांपुढे आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आयुक्त कार्यालयाकडून संबंधित पक्षांना ही माहिती देण्यात आली असून सुनावणीची पुढची तारीख नंतर कळविण्यात येईल असं दोन्ही पक्षांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या 6 नगरसेवकांचं राजकीय भवितव्य अजून अधांतरी मानलं जातेय.
गेल्या महिन्यात मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याप्रकरणी आर्थिक व्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांच्या संपत्तीची चौकशीची केली आहे मागणी. सहा नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे मुंबईतील राजकारण चांगलंच तापले होते. मनसेलाही याचा मोठा धक्का बसला. आता मनसेकडे एकच नगरसेवक राहिला आहे.
COMMENTS