राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईकरांसाठी मनसेकडून मिळणार स्वस्त पेट्रोल-डिझेल !

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईकरांसाठी मनसेकडून मिळणार स्वस्त पेट्रोल-डिझेल !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मनसे सैनिकांनी भाजपविरोधात अनोखं आंदोलन करण्याचं ठरवलं असून 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून मुंबईतील 36 पेट्रोल पंपावर वाहन चालकांना पेट्रोल-डिझेलवर 4 रुपये सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप सरकारविरोधात अभिनव आंदोलन करणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडत असल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्यामुळे सामान्य माणसाचं कंबरडं मोडत आहे. त्यामुळे भाजप सरकारला याबाबत जागं करण्यासाठी मनसेनं आंदोलनाची वेगळी पद्धत सुरु केली असल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांचा 50 वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा उपक्रम मनसे कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे थोडासा का होईना मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS