ठाणे – एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनवरील फेरीवाल्यांना 15 दिवसात हटवा अन्यथा मनसेच्या स्टाईलने हटवू असा इशारा दिला होता. फेरीवाल्यांठी दिलेली मुदत संपताच ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्टेशनमधील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. सकाळी 9 च्या सुमारास जवळपास 50 कार्यकर्ते मनसेचे झेंडे घेऊन स्टेशन परिसरात आले आणि त्यांनी तिथे असलेल्या फेरीवाल्यांना हुसकावून लावलं. फेरीवाल्यांचा हा प्रकार बंद झाला नाही तर अशा पद्धतीनं मनसे स्टाईल कारवाई केली जाईल असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.
Newer Post
माधव भांडारी, भाजपचे मुख्य प्रवक्ते Older Post
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
COMMENTS