मुंबई – मुंबईतील सायन – पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरुन आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधाकम विभागाच्या कार्यलयाची तोडफोड केली. याबाबत या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन योग्यच असल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारला खड्डे दिसत नसतील तर आंदोलन नक्कीच दिसेल असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण – डोंबिवली या भागांमध्ये सध्या खड्ड्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. सायन- पनवेल हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून हे खड्ड्यांमुळे मोठमोठे अपघात होत आहेत. एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीन दिवसांपूर्वी येथील रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली होती. त्यावेळी युद्धपातळीवर दुरुस्ती केली जाईल असे आश्वसन दिले होते. मात्र जे काम सुरु आहे ते नित्कृष्ट दर्जाचे असून पावसातही ते वाहून जात आहे, अशी तक्रार वाहनचालक करत आहेत. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज जोरदार आंदोलन केलं आहे.
COMMENTS