मोदींच्या लग्नाविषयी  आनंदीबेन पटेल यांचं खळबळजनक वक्तव्य ! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल !

मोदींच्या लग्नाविषयी  आनंदीबेन पटेल यांचं खळबळजनक वक्तव्य ! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लग्नावरुन ब-याच उलट सुलट चर्चा सुरू असतात. 2014  पूर्वी लग्नाबाबतचा निवडणूक प्रतिज्ञापत्रकातील कॉलम रिकामा ठेवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुक प्रतिज्ञापत्रात मात्र आपण विवाहित असल्याचं सांगितलं होतं. जशोदाबेन असं पत्नीचं नावही त्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं होतं. मात्र गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मात्र नरेंद्र मोदी यांनी लग्न केलेच नाही ते अविवाहित आहेत असा दावा केला आहे.

मध्यप्रदेशमध्ये एका कार्यक्रमात अंगणवाडीच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. मोदींनी स्वतःत आपण विविहीत असल्याचं प्रतिज्ञापज्ञात लिहिलं असताना आनंदीबेन पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आश्चर्यव्यक्त केलं जात आहे. सर्व जगाला माहित आहे, तुम्हालाही माहित आहे की नरेंद्र भाईंनी तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी लग्न केलं नाही. मात्र त्यांना महिलांच्या सर्व समस्या माहित आहेत. त्यामुळे महिलांसाठी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या आहेत असंही आनंदीबेन पटेल म्हणाल्या.

COMMENTS