पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, त्या ईमेलमुळे देशभरात खळबळ !

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, त्या ईमेलमुळे देशभरात खळबळ !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून अज्ञातानं धमकीचा मेल दिल्ली पोलिसांना पाठवला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. तसेच हा मेल नेमका कोणी पाठवला याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र या मेलमुळे मोदींच्या जीवाला धोका असल्याचे समोर आलं आहे. हा मेल पूर्वेकडील राज्यातून आला असल्याचा अंदाज पोलिसांनी मांडला असून याबाबतचा अधिक तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

यापूर्वीही पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या धमकीची एक पोस्ट ‘फेसबुक’वर आली होती. गाझियाबादमध्ये राहाणार्‍या एका व्यक्तीने ही पोस्ट केली होती. नरेंद्र मोदी यांना गोळी घालेन, असे त्यात म्हटले होते. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. तसेच पुण्यातील भीमा-कोरेगांव हिंसाचाराच्या चौकशीत पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. चौकशीत डाव्या पक्षाच्या नेत्यांचे एक पत्र सापडले होते. त्यात राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा उल्लेख होता. त्यानंतर पुन्हा धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

 

COMMENTS