अहमदाबाद – अनेकांना आपण गोरं असावं अस वाटतं. मग त्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करतात. कोणी आहारात बदल करतं, कोणी बाजारात मिळणा-या वेगवेगळ्या क्रीमचा वापरत करतं. त्याचा वापर केल्यानंतर किती गोरं होतं हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही गोरं होण्यासाठी प्रयत्न करतात. हे आम्ही नाही सांगत. तर गुजरातमधील ओबीसी नेते आणि गेल्या काही दिवासंपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अल्पेश ठाकूर यांनी हा दावा केला आहे. गोरं होण्यासाठी पंतप्रधान दररोज मशरुम खातात म्हणे. पूर्वी मोदी माझ्यासारखे सावळे होते. मात्र ते नियमितपणे महागडे मशरुम खातात. त्यामुळे ते गोरे झाले आहेत असंही अल्पेश ठाकूर यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते अल्पेश ठाकूर यांनी ट्विट करुन हा दावा केला आहे. पंतप्रधान आयात केललं मशरुम खातात. एका मशरुमची किंमत 80 हजार रुपये आहे. दररोज ते 5 मशरूम खातात. म्हणज्ये त्यांचा मशरुमचा दिवसाचा खर्च 4 लाख रुपये आहे असाही दावा अल्पेश ठाकूर यांनी केला आहे. पंतप्रधान चायवाला म्हणून स्वतःला समजतात आणि महागड्या वस्तू वापरतात, त्यांचा कोट, त्यांचा आहार हा खूपच महागडा असतो हे सांगण्यासाठी अल्पेश ठाकूर यांनी हा दावा केला आहे. आता अल्पेश यांच्या आरोपावर मोदी काय उत्तर देतात आणि गुजरातची जनता काय म्हणते हे मतमोजणीच्या दिवशीच आपल्याला लक्षात येईल.
COMMENTS