देशभरातील शेतकय्रांसाठी मोदी सरकारची नवी योजना, सरकार दरबारी हालचालींना वेग!

देशभरातील शेतकय्रांसाठी मोदी सरकारची नवी योजना, सरकार दरबारी हालचालींना वेग!

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील शेतकय्रांना खूश करण्यासाठी मोदी सरकार नवी योजना काढत आहे. या योजनेअंतर्गत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असून या योजनेसंदर्भात सरकार दरबारी हालचाली सुरु आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे, खत, कीटकनाशक आणि मजुरी यासाठी ठराविक रक्कम सरकारकडून दिली जाणार आहे.योजनेसाठी सुमारे १. २५ लाख कोटी रुपये लागणार असून केंद्र सरकार राज्यांच्या मदतीने ही योजना राबवणार आहे. या योजनेत ७० टक्के वाटा केंद्राचा असेल तर ३० टक्के वाटा राज्य सरकारचा असणार आहे.

या योजनेवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसून या योजनेसाठी सरकार दरबारी बैठकांचे सत्र सुरु असल्याची माहिती आहे. याशिवाय केंद्र सरकार विविध प्रस्तावांचा विचार करत आहे. निती आयोगाने केंद्र सरकारला शेतकऱ्यांसंदर्भात काही शिफारशी केल्या होत्या. यात पिकाला किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळाल्यास शेतकऱ्याला अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली होती. यासंदर्भातही केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती आहे.

COMMENTS