मोदी सरकार पारदर्शकतेच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटत आहे –  सोनिया गांधी

मोदी सरकार पारदर्शकतेच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटत आहे –  सोनिया गांधी

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिवाळी अधिवेशनावरुन काँग्रेसच्या वर्कींग कमिटीच्या बैठकीत सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकार पारदर्शकतेच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटत हिवाळी अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. त्यांनी जीएसटीवरुनही केंद्र सरकरावर टीकेची झोड उठवली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊन ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चालते. मात्र यावर्षी सरकार डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून 10 दिवसाचे हिवाळी अधिवेशन घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी केलेले ऐतिहासिक कार्य पुसण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

COMMENTS