मुंबई – आगामी युतीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीत भोजनाचे निमंत्रण दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु मोदी यांनी भोजनासाठी मातोश्रीवर यावे असा आग्रह शिवसेनेकडून धरला जात आहे.निवडणुकीला अवघे दोन ते तीन महिने उरलेले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील युतीचा तिढा सोडवण्यासाठी हालचाली सुकु झाल्या असल्याचं दिसत आहे.
युतीचा हा तिढा सोडवण्यासाठी आता पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला असून उद्धव यांना दिल्लीत भोजनाकरिता बोलावले आहे. शिवसेनेने सुद्धा हे निमंत्रण फेटाळलेले नसल्यामुळे जेवणाच्या टेबलावर युतीचा तिढा सुटू शकतो असं बोललं जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये भोजनाचा कार्यक्रम झाला तर आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्र लढवणार का ? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS