शुक्रवारी लोकसभेत टीडीपीनं आणलेल्या अविश्वास ठरावाच्यावेळी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात झालेली गळाभेट चांगलीच चर्चेत आहे. सोशल माध्यमांसह इतर माध्यमांमध्ये याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काहींनी या भेटीचं वर्णन औचित्यभंग होता असं केलं. लोकसभेच्यया अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र याबाबत राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. राजकारणातील कटुता संपवण्याच्या दृष्टीने राहुल गांधी यांनी केलेली कृती योग्य असल्याचं पवार म्हणाले.
भाजपनं गळाभेटीतील राहुल गांधी यांच्या कृत्यावर टीका केली असली तरी विविध राजकीय पक्षांनी त्यांचं कौतुकच केलं आहे. अगदी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनंही राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा आता आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे.
COMMENTS