ऐकावं ते नवलच, मोदी-शहांचा शेतामध्ये बुजगावणी म्हणून वापर !

ऐकावं ते नवलच, मोदी-शहांचा शेतामध्ये बुजगावणी म्हणून वापर !

बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ! पण हे खरं आहे. कर्नाटकात नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. मोठ्या प्रमाणात प्रचार केला. मोदी – शहा हे राज्यातले पक्षाचे स्टार प्रचारक होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्यही वापरण्यात आलं होतं. प्रचाराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पोस्टर आणि कटआऊट्स मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली होती. राज्यभरात अनेक ठिकाणी मोदी शहांची कटआऊट्स लागली होती. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे निवडणुकीत वापरून झालेल्या साहित्याचं काय करायचं असा प्रश्न एका शेतक-याला पडला. त्याने मोदी शहा यांची कटआऊट्स थेट शेतात नेली आणि बुजगावणी म्हणून शेतात लावली आहेत.

शेतात पक्षांपासून पिकांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी शेतात बुजगावणी लावतात. कर्नाटकातील या शेतक-याने थेट मोदी शहा यांची बुजगावणी वापरली. मोदी शहांच्या या कटआऊट्सचा भाजपला कर्नाटकात किती फायदा झाला हे तुम्ही पाहिलंच आहे. आता ती बुजगावणी हुबळीतल्या त्या शेतक-याला किती फायदेशीर ठरतात ते पहावं लागेल. पण त्या शेतक-याचा आयडिच्या कल्पनेला सलामच केला पाहिजे. द क्विंट या बेबसाईटनं हे वृत्त दिलं आहे.

COMMENTS