मोदी-शहांच्या विरोधात भाजपात बंड ?

मोदी-शहांच्या विरोधात भाजपात बंड ?

देशात सरकारविरोधात हळुहळु नाराजी वाढत आहे. त्याचप्रमाणत पक्षात नेत्यांचीही नाराजी वाढत आहे. मोदी शहा एकाधिकारशाहीला हळूहळू विरोध होत आहे. 2014 मध्ये मोदींच्या लाटेत देशात सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर मोदींनी आपले अत्यंत विश्वासू अमित शहा यांना पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नेमले. सुरूवातील मोदी लाटेचा इतका प्रभाव होता की त्याला विरोध करण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. आता मात्र पुलाखालून बरच पाणी गेलं आहे. हळूहळू सरकार आणि मोदी शहा यांच्या विरोधात जनतेमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणत रोष वाढत आहे.

मोदी आणि शहा यांच्या एकाधिकारशाहीला विरोध करणा-या नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये भाजपचे अनेक बडे नेते सहभागी होते. या नेत्यांच्या बैठकीत पक्षाच्या अनेक नाराज खासदारांनी बंडखोर नेत्यांना पाठिंबा दर्शवला आहे. नाराज खासदारांची संख्या 150 च्या आसपास असल्याचंही कळतंय. पक्षाच्या बैठकीत मोदींच्या विरोधात रणशिंग फुंकण्याची रणनितीही आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बंडाला आता मोदी शहा कसे थंड करतात की देशात नेतृत्वबदल होतो हे येणा-या काही काळात दिसून येईल.

(हे वृत्त एप्रिल फूल समजावे भविष्यात असे काही घडलेच तर निव्वळ योगायोग समजावा)

COMMENTS