पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार दिलीप मोहिती पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वीकृत नगरसेवकाच्या पत्नीचा विनभंग केला असल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला असून स्वीकृत नगरसेवकाच्या मार्केटयार्ड येथील दुकानात जाऊन शिवीगाळ करत त्यांच्या पत्नीचा विनयभंग केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
दरम्यान काल रात्रीदरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचे पती तसेच स्वीकृत नगरसेवकाचे अपहरण करण्यात आले असल्याचा आरोपही पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमकं यात तथ्य काय आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात सध्या तणावाचं वातावरण पहावयास मिळत आहे.
COMMENTS