…अन् विधानभवनात अवतरले ‘तुकाराम महाराज’ !

…अन् विधानभवनात अवतरले ‘तुकाराम महाराज’ !

नागपूर –  संभाजी भिडे यांनी संतांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधानभवनात उमटले असल्याचं दिसून आलं आहे. तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षा मनू हा एक पाऊल पुढे होता असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत आज विधानभवन परिसरात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत आले. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली असल्याचं पहावयास मिळालं आहे. “ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान..””नाही सहन करणार संतांचा अपमान..” अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि गजभिये यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडून “ग्यानबा तुकाराम, भिडेचं काय काम?” अशा घोषणा दिल्या.

दरम्यान काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनु हा एक पाऊल पुढे होता असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला होता. तसेच आम्ही महाराष्ट्रात मनुचा पुनर्जन्म होऊ देणार नसल्याचा इशाराही यावेळी आव्हाड यांनी दिला होता.

COMMENTS