नवी दिल्ली – राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या दीर्घ आजाराने ते त्रस्त होते. सिंगापूरमधील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्तक्रिया करण्यात आली होती. मात्र आज त्यांचे निधन झाले. ते समाजवादी पक्षाचे नेते होते. उत्तर प्रदेशात समाजवादीला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री होती. समाजवादी आणि काँग्रेस पक्षाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून अमर सिंह यांना ओळखले जाते.तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. समाजवादी पक्षाला UPA सोबत जोडून ठेवण्याचा मुख्य काम अमर सिंह करत होते.
दरम्यान अमर सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. “अमर सिंह हे एक ऊर्जावान नेते होते. गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील राजकारणातील अनेक चढ-उतार त्यांनी फार जवळून पाहिले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी फार दु:खी झालो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
COMMENTS