पुणे – शहरात भाजपमध्ये पक्षांतर्गत गटबाजी आणि सुंदोपसुंदी टोकाला गेली असताना भाजपचे लोकसभा खासदार अनिल शिरोळे २०१९ च्या तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीकोणातून त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमाला केवळ पक्षातीलच नाही तर पक्षाबाहेरचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येंन हजेरी लावली असल्याचं पहावयास मिळालं आहे. झालं गेलं विसरून एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. त्यामुळे आपल्यात सारंकाही आलबेल असल्याचं दाखविण्याची संधी सर्व गटबाजांना मिळाली आहे.
दरम्यान शिरोळेंच्या आमंत्रणाला सगळ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे राज्यसभेचे खासदार संजय काकडे आणि पालकमंत्री गिरीश बापट अगदी आमच्यात तसलं काहीच नाही अशा अविर्भावात पाहायला मिळाले. केवळ इतकच नाही, तर पुण्यातील काँग्रेसचे माजी खासदार सूरेश कलमाडी देखील शिरोळेंना शुभेच्छा देऊन गेले. काँग्रेस राष्ट्रवादीचे इतर अनेक नेतेही स्नेहमिलनात सहभागी झाले. एकूणच काय तर शिरोळेंच्या या जंगी मेजवानीला चांगलीच गर्दी झाली होती. आता ही डीनर डिप्लोमसी नुसतंच स्नेहमिलन ठरणार की त्यातून काही मनोमिलनही घडणार याबद्दल उत्सुकता लागली आहे.
COMMENTS