आरक्षण गेलं खड्ड्यात, खासदार छत्रपती संभाजीराजे संतापले!

आरक्षण गेलं खड्ड्यात, खासदार छत्रपती संभाजीराजे संतापले!

मुंबई – खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.  ‘आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे.तसेच आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही?’ असे सवाल संभाजीराजे यांनी केले आहेत.

दरम्यान उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवलं आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला 94% गुण मिळूनही त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. या घटनेबद्दल ट्विटरवर माहिती देत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.’आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे.

तसेच याला नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे.केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट होउ शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षंच नाही असं समजू नका. ‘शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये’ असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते,ते आजही तंतोतंत खरे असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS