होपपिचवर खडसेंचा मोठा विजय, मुक्ताईनगरची नगरपंचायत आरामात जिंकली !

होपपिचवर खडसेंचा मोठा विजय, मुक्ताईनगरची नगरपंचायत आरामात जिंकली !

जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं होमपिच असलेल्या मुक्ताईनगरमध्ये पहिल्याच निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला आहे. एकूण 17 पैकी जागांपैकी एकट्या भाजपने 14 जागा जिंकल्या आहेत तर तीन जागा शिवसेनेनं जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपच्या नजमा तडवी ११७५ मतांनी विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदांसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झाली.

विधीमंडळाचं अधिवेशन सोडून एकनाथ खडसे प्रचारामध्ये बिझी होते. अधिवेशन सोडून खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये तळ ठोकला होता. सध्या खडसे भाजपवर प्रचंड नाराज आहेत. पक्षातील काही लोक आपल्याला त्रास देत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. त्यामुळेच या निवडणुकीकडं राज्याचं लक्ष लागलं होतं. १५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत ६५.४६% झालं होतं. मुक्ताईनगर नगरपंचायत झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती.

COMMENTS