मुंबई – मल्टिप्लेक्सविरोधात मनसेनं केलेलं आंदोलन यशस्वी झालं असल्याचं दिसत आहे. कारण मल्टिप्लेक्स चालकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान मनसेनं ठेवलेल्या नऊ अटी या चालकांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे मल्टिप्लेक्समधील पाण्याची बाटली, पॉपकॉर्न, समोसा अशा पदार्थांचे दर कमी करण्याचं आश्वासन या मल्टिप्लेक्स चालकांनी दिलं आहे.मनसेच्या या आंदोलनासंदर्भात हायकोर्टात जाऊनही मल्टिप्लेक्स चालकांना कोणताही दिलासा मिळाला नाही, त्यामुळे या चालकांनी आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मल्टिप्लेक्स चालकांसमोर काही अटी ठेवल्या. या अटी मान्य असल्याचं मल्टिप्लेक्स चालकांनी म्हटलं आहे.
दैनंदिन विवंचनेतून २ क्षण मनोरंजनाचे असावेत म्हणून चित्रपट पहायला येणाऱ्या जनतेची मुस्कटदाबी करून अवाजवी दरात आवश्यक खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या चित्रपटगृहांना मिळाला #मनसेदणका.
आता प्रेक्षकांची पिळवणूक होणार नाही… प्रश्न कोणताही असो, उत्तर फक्त 'मनसे' ! pic.twitter.com/I8y2DtX0X6— MNS Adhikrut (@mnsadhikrut) July 7, 2018
दरम्यान मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमती कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मनसेने पुण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये खळ्ळ खटॅक आंदोलन केले होते. त्यानंतर मल्टिप्लेक्स चालकांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली असून या भेटीदरम्यान मल्टिप्लेक्समधील चहा-कॉफी, वडा-समोसा आणि पॉपकॉर्न यांचे दर ५० रूपयांपर्यंत करण्याची तयारी मल्टिप्लेक्स चालकांनी दर्शवली आहे. हे दर येत्या दोन ते तीन दिवसात कमी न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशाराही मनसेने दिला आहे.
COMMENTS