निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची महत्त्वाची बैठक !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची महत्त्वाची बैठक !

मुंबई – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव,पक्षाचे राज्य संघटन मंत्री विजय पुराणिक,शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करायचा, कोणत्या भागात कोणते प्रमुख मुद्दे असावेत यावर बैठकीत चर्चा सुरु आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारीही बैठकीला उपस्थित आहेत.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप- शिवसेना युतीबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. युतीची बोलणी सुरु असताना दोन्ही पक्षांकडून स्वबळावर लढण्याबाबतही चाचपणी सुरु आहे. त्यामुळे याबाबतही या बैठकीत चर्चा होणार का हे पाहण गरजेचं आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS