मुंबई – मुंबई महापालिकेच्या स्थायी सभापती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. ऐनवेळी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवल्यामुळे भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार दिला होता. पण, आज ऐनवेळी काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसंच मतदानाच्या वेळी काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली. तर, राष्ट्रवादी आणि सपाच्या नगरसेवकांनी शिवसेना उमेदवार संध्या दोशी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या स्थायी सभापती आणि शिक्षण समितीची आज निवडणूक पार पडली. शिक्षण समितीची निवडणुकीत नाट्यमय घडामोडींना वेग आला. ऐनवेळी काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या संध्या दोशी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिक्षण समिती निवडणुकीत भाजपच्या सुरेखा पाटील यांचा संध्या दोशी यांनी पराभव केला आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर आता स्थानिक निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र येत भाजपला दूर सारत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्यातील इतर निवडणुकीतही हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS