मुंबई – मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांना हटवण्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच संजय निरुपमांऐवजी मिलिंद देवरा यांच्या नियुक्तीसाठी दबाव आणला जात असल्याचं बोललं जात आहे. मुंबई काँग्रेसमधील नेत्यांनीत निरुपमांविरोधात जोरदार मोहीम राबवल्यामुळे निरुपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटलवलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान काँग्रेसमधीलच काही नेत्यांमध्ये संजय निरुपम यांच्याबाबत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे काही दिवसांपासून निरुपम यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी या नेत्यांकडून केली जात होती अशी माहिती आहे. परंतु सध्या ही मागणी जोर धरत असून निरुपय यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यासाठी दबाव आणला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडले असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS