मुंबई – शिवसेना आणि काँग्रेसनं आज केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं आहे. कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसनं तर हाथरस येथील घटनेविरोधात शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन मुंबईत आंदोलन केलं आहे. केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करुन त्याचे कायदे बनवले असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्र सरकारच्या या कायद्यांविरोधात काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलं.
दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या एका दलित महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात तसेच योगी सरकारच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने आज चर्चगेट येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोदी, योगी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोदी, योगी सरकार हाय हाय, योगी सरकार हटाव बेटी बचाव अशा घोषणा आंदोलनस्थळी शिवसैनिकांनी दिल्या.
COMMENTS