मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई – लोकसभेची निवडणूक 6 महिन्यांवर तर विधानसभेची निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या काळात अनेक पक्षांतरे होतात. सर्वजण निवडूण येण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ आणि सुरक्षित पक्ष शोधत असतात. मुंबईतही त्याची सुरूवात झाली आहे. काँग्रेसचा एक बडा नेता शिवेसनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात त्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अंधेरी पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अंधेरीमधून तीन वेळा   नगरसेवक तर अंधेरी पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून जाधव निवडून आले होते. या मतदार संघात अशोक जाधव यांची मोठी ताकद आहे. त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे.  मात्र  2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेत अमित साटम यांनी अशोक जाधव यांचा पराभव केला होता. अशोक जाधव हे दिवंगत गुरुदास कामत गटाचे समजले जातात. कामत यांच्या निधनानंतर कामत गट पोरका झाला आहे. त्यामुळे त्याचे एक एक मोहरे गळून पडत आहेत. शिवसेनेलाही त्या मतदारसंघात ताकदीचा उमेदवार नाही. त्यामुळे शिवसेनाही जाधव यांना पक्षात घेऊ शकते.

COMMENTS