मुंबई – कोरोनामुळे राज्यातील अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. या नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचा समाजकल्याण विभाग दिवसरात्र प्रयत्न करत आहे. परळी तालुक्यातील माळहिवरा येथील एक महिला मुंबई येथे अडकल्याची
माहिती धनंजय मुंडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ या महिलेपर्यंत मदत पोहचवली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांना परळी तालुक्यातील माळहिवरा येथील एका महिला मुंबई येथे अडकल्याची माहिती एका वृत्तपत्राद्वारे मिळाली. ही माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी तातडीने याची दखल घेत आपल्या समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत या महिलेस मदत मिळवून दिली.
ठाणे विभागाचे समाज कल्याणचे अधिकारी शिंदे या महिलेला मदत करण्यासाठी गेले तेव्हा धनंजय मुंडे यांचे नाव घेताच सदर महिला धनुभाऊ आमचेच आहेत मी त्यांना ओळखते असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंचे आभार मानले. विशेष म्हणजे या महिलेचा मोबाईल नंबर नसतानाही समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केवळ वृत्तपत्रातील बातमीच्या माध्यमातून या महिलेला शोधून काढले. व तिच्यापर्यंत मदत पोहचवली.
COMMENTS