मुंबई – विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून अखेर आरोग्य मंत्री डॉ. दीपक सांवत यांचा पत्ता शिवसेनेनं कट केला आहे. सावंत यांच्याऐवजी विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. दीपक सावंत हे गेली तीन टर्म या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले आहेत. तसंच शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यापासून सांवत यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्याविषयी पक्षामध्ये मोठी नाराजी होती. पक्षाच्या बैठकीत वेळोवेळी पदाधिका-यांनी ती नाराजी वक्त केली होती. त्याची दखल घेत पक्षानं उमेदावारी बदलली आहे.
पक्षाकडून पुन्हा संधी मिळावी यासाठी डॉ. सावंत यांनी अटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर पक्षातील नाराजीचा सूर ओळखून शिवसेनेनं पदवीधरमधील भाकरी फिरवली आहे. आता डॉ. सावंत तात्काळ राजीनामा देतात की सहा महिने मंत्रिपदावर राहतात ते पहावं लागेल. विलास पोतनीस हे बोरीवलीचे विभागप्रमुख आहेत. तसंच लोकाधिकार समितीचे गेली अनेक वर्षे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत.
COMMENTS