मुंबई – कांदिवलीत मनसेला धक्का, शाखाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांचा भारिप बहूजन महासंघात प्रवेश !

मुंबई – कांदिवलीत मनसेला धक्का, शाखाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांचा भारिप बहूजन महासंघात प्रवेश !

मुंबई – मुंबईतील कांदिवली येथील चारकोपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार धक्का बसला असून भाबरेकरनगर येथील मनसेचे शाखाध्यक्ष उत्तम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारिप बहूजन महासंघात प्रवेश केला आहे.  याबाबतची माहिती भारिप बहूजन महासंघाचे कांदिवली-चारकोप तालुकाध्यक्ष दादा कांबळे यांनी दिली आहे.  तसेच भाबरेकरनगर येथील भारिप बहूजन महासंघाच्या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आले असून या कार्यालयाला प्रकाशगड असे नाव देण्यात आले आहे.  भारिपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनिल पवार,उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष मुकेश(भाई)पुजारी, उत्तर मुंबई जिल्हा जनरल सेक्रेटरी शेखर भाई श्रीवास्तव,उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

दरम्यान मनसेतून भारिप बहूजन महासंघात प्रवेश केलेल्या उत्तम पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचं स्वागत याठिकाणी तालुकाध्यक्ष दादा कांबळे यांनी केलं आहे. तसेच उत्तम पवार यांना भारिप बहूजन महासंघमध्ये तालुका सचिव हे पद देण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांसह तालुका सरचिटणीस रमेश महागाडे,तालुका महिलाध्यक्षा प्रज्ञा कांबळे,  उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मच्छींद्र माने, उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष मुकेशभाई पुजारी, उत्तर मुंबई जिल्हा सरचिटणीस शेखर श्रीवास्तव, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील पवार, वॉर्ड क्रमांक 22 चे भारीप अध्यक्ष शशिकांत मोहिते आणि महिलामंडळ तसेच वॉर्ड 19 चे अध्यक्ष वामन दांडेकर, वॉर्ड क्र. 31 चे अध्यक्ष जाधव, तालुका संघटक बाळासाहेब कांबळे, मोहम्मद इस्लाम शेख, तालुका उपसचिव  व तालुका उपाध्यक्ष संतोष ठाकूर हे उपस्थित होते.

 

 

COMMENTS