मुंबई – जोरदार पडलेल्या पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. लोकल रेल्वे उशीराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर या विस्कळीत लोकलसेवेचा फटका राज्यमंत्र्यांना देखील बसला आहे. कल्याण – डोंबिवली अधिवेशनासाठी मुंबईकडे निघालेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे रेल्वेत अडकले होते. रस्ते वाहतूक सुरळीत नसल्यामुळे अधिवेशनात लवकर जाता यावे म्हणून चव्हाण यांनी रेल्वेने प्रवास केला होता.
परंतु लोकल सेवाही विस्कळीत झाल्यामुळे चव्हाण हे लोकलमध्ये ताटकळत बसले. त्यामुळे ते अधिवेशनातही वेळेवर पोहचू शकले नाहीत.
दरम्यान मुंबई -ठाणेची दुर्देवी अवस्था झाली आहे.नालेसफाईमध्ये आपली घरे भरणारे हे आजच्या परिस्थितीला जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तेच तेच कंत्राटदार आहेत जे ही सर्व कामे करतात शिवसेना – भाजप हे आजच्या परिस्थितीला जबाबदार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
COMMENTS