मुंबई – आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. लालबाग येथील भारतमाता चित्रपट गृहासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू झाले. सकाळी 10.30 वाजल्यापासून मराठा समाजातील तरुण कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे शासकीय महापूजेला जाण्यापूर्वी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन महापूजा करण्याचे टाळावे असेही आवाहन आंदोलकांतर्फे करण्यात आलं आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने संपूर्ण राज्यात ५८ क्रांती मोर्चे काढले. शांततेच्या मार्गानी मूक मोर्चे काढून ही सरकार समाजाला प्रतिसाद देत नाहीये. तब्बल २ वर्षे संयमाने लोकचळवळ चालवून ही सरकार दखल घेत नसेल तर समाजाने तरी कोणता मार्ग निवडायचा असा प्रश्न आंदोलन कर्त्यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा बांधव गेले ५ दिवस ठिय्या देऊन बसलाय पण सरकार प्रतिसाद देत नाहीये. संबंध महाराष्ट्रातून मराठा बांधवांनी प्रतिकात्मक ठिय्या मोर्चे काढून सरकारला जागे करायचे काम चालूही केलेय. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत देखील ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे.
COMMENTS