मुंबई महापालिकेतील महापौर निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत भाजपचा मोठा निर्णय!

मुंबई महापालिकेतील महापौर निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत भाजपचा मोठा निर्णय!

मुंबई – राज्यात अजूनपर्यंत सत्तास्थापन करण्यात एकही पक्ष यशस्वी झाला नाही. त्यामुळे हा तिढा कधी सुटणार याबाबतची चर्चा सुरु असतानाच आता महापालिकेतील महापौर निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच  महापालिकेतील महापौर निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे.भाजपकडे आवश्यक नगरसेवक संख्याबळ नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिली आहे.

दरम्यान भाजपने उमेदवार देण्यास नकार दिला असला, तरी दुसरीकडे शिवसेनेचा नवा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची दाट शक्यता आहे. महासेनाआघाडीच्या चर्चा सुरु असल्या तरी मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधीपक्षाच्या भूमिकेतच राहणार आहे. दुपारी 3 वा. महापालिकेत सर्व काँग्रेस नगरसेवकांना बोलावण्यात आले आहे. विरोधीपक्षाची भूमिका म्हणून काँग्रेस आपला अर्ज दाखल करणार आहे. मात्र, दिल्ली हायकमांडने आदेश दिल्यास काँग्रेस दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागेही घेऊ शकते असं बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS