राज- उध्दव ठाकरे एकत्र

राज- उध्दव ठाकरे एकत्र

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थान झाल्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला चुलत बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला देशभरातील नेत्यांना निमंत्रण होतं. मात्र, राज ठाकरे यांची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तब्बल एक वर्षांनंतर राज-उद्धव एका मंचावर येणार आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी तथा निमंत्रण देण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेतली.

COMMENTS