मुंबई – महापालिका कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर, गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय !

मुंबई – महापालिका कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर, गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय !

मुंबई – मुंबई महापालिकेतील कर्मचा-यांना दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. आज झालेल्या महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका कर्मचा-यांना १५ हजार रूपयांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.  १ लाख ५ हजार कर्मचा-यांना हा बोनस मिळणार आहे. मागील वर्षी १४ हजार ५०० रूपये बोनस दिला होता, यामध्ये यंदा ५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान गटनेत्यांच्या या निर्णयानंतर महापालिका कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेतील कामगार संघटनांनी ४० हजार रूपये बोनस देण्याची मागणी केली होती. परंतु महापालिकेनं केवळ 15 हजार बोनस दिला असल्यामुळे या कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS