आजच्या बैठकीत मुंबई युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली ‘ही’ मागणी!

आजच्या बैठकीत मुंबई युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली ‘ही’ मागणी!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी
मुंबई युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मुंबईचे राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून अमोल कोल्हे यांना जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्याचा राष्ट्रवादीला मुंबईत फायदा होईल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसनं ही मागणी केली आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईचा आढावा घेताना मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईचे राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून अमोल कोल्हे यांना जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुंबई राष्ट्रवादीच्या प्रभारीपदी अमोल कोल्हे यांची नियुक्ती केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

COMMENTS