घाटकोपरमधील विमान दुर्घटना, दोषींवर कडक कारवाई करणार –मुख्यमंत्री

घाटकोपरमधील विमान दुर्घटना, दोषींवर कडक कारवाई करणार –मुख्यमंत्री

मुंबई – घाटकोपरमध्ये आज चार्टर्ड विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून यापैकी विमानातील चार जण व एका पादचा-याचा मृत्यू झाला आहे. वैमानिक मारिया कुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात हे विमान कोसळलं असून त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून दुर्घटनेची योग्य चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. ‘ही अत्यंत दुर्देवी घटना असून दुर्देवात सुदैव एवढंच की बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी विमान पडल्याने आजुबाजूच्या इमारतींमधील रहिवासी सुखरुप आहेत. याप्रकरणी उड्डाण मंत्रालयाने चौकशीचा आदेश दिला असून मीदेखील त्यांना विनंती केली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS