मुंबई – अनेकवेळा खेडेगावातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. परंतु मुंबई शहरात जर काही तासासाठी वीज बंद झाली तर काय होऊ शकते याची कल्पना तुम्ही करू शकता. शहरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे पश्चिम-मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक ठिकाणचे शिग्नल बंद असल्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रेल्वे सेवा, रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे मुंबईतील चाकरन्यांचे प्रचंड हाल झाले असल्याचं पहावयास मिळाले आहे. रस्त्यावरील आणि रेल्वे सेवा बंद पडल्यामुळे मुंबईकर चांगलेच अडकूण पडले होते. अति उच्चदाब वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान याचा परिणाम रायगड जिल्ह्यावरही झाला असून निम्म्या रायगडमधील वीज गायब झाली होती. अलिबाग , पेण , पनवेल , उरण , कर्जत , खालापुरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
टाटा कडु्न येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाते.— BEST Electricity (@myBESTElectric) October 12, 2020
वीज पुरवठा खंडित झाल्याचा मुद्दा पकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकार अंधारात गेले आहे. याला पूर्णपणे ठाकरे सरकार आणि वीज कंपन्या जबाबदार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
COMMENTS