मुंबई – आरजे मलिष्काने पुन्हा एकदा मुंबईतल्या खड्ड्यांवरून गाण तयार केलं आहे. या गाण्यात तिने मुंबई महानगरपालिकेचे वाभाडे काढले आहे. मुंबईतल्या खड्डयांवरून आरजे मलिष्कानं सलग तिस-या वर्षी गाण तयार केलं आहे. 2017 मध्ये मलिष्काने बीएमसीवर भरवसा नाही का हे गाण काढलंं होतं. त्यानंतर 2018 मध्ये मलिष्काने दुसरे सैराटच्या गाण्याच्या तालावर..गेली गेली मुंबई खड्यात तयार केले होते. ही मागील दाेन वर्षांची गाणीही मुंबईकरांनी डाेक्यावर घेतली हाेती. त्यानंतर आता तिने नवीन गाण तयार केलं आहे.
दरम्यान विडंबनात्मक गाणे करू नये म्हणून पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी मलिष्काला पावसाळ्यापूर्वीच जून महिन्यात पालिका करत असलेल्या मान्सून कामांची माहिती दिली हाेती. त्यासाठी विविध ठिकाणी जावून खुद्द आयुक्तांनी मलिष्काला कामे दाखवली हाेती. तरीही मलिष्कानं खड्डे वाढल्यानंतर हे तिसरे गाणं तयार केलं आहे.
COMMENTS