संविधान बचाव रॅलीची सांगता, देशभरातील दिग्गज नेत्यांनी घेतला सहभाग !

संविधान बचाव रॅलीची सांगता, देशभरातील दिग्गज नेत्यांनी घेतला सहभाग !

मुंबई – प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून देशातील विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी संविधान बचाव रॅली काढली होती. मुंबई विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रॅली काढण्यात आली. गेट वे ऑफ इंडियापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांसह देशभरातील नेत्यांनी सहभाग घेतला होता.

या रॅलीत गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनीही सहभाग घेतला होता. मोदी सरकारच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. ‘संविधान वाचवण्यासाठी आम्ही आलो असून या राज्यांत मोदींचा गुजरात मॉडेल हुकूमशाही कारभार पद्धत वापरली जात असल्याचा आरोप हार्दिकनं केला आहे.  हार्दिक पटेलसह राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जनता दलचे नेते शरद यादव, माकपचे सीताराम येचुरी, लोक भारतीचे कपिल पाटील, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, कन्हैया कुमार आदी सहभागी झाले होते.

COMMENTS