मुंबई – शिवसेनेचे सायन प्रतिक्षानगर भागातील प्रभाग क्रमांक 173 चे विद्यमान नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे आकस्मित निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रक्तात साखरेचं प्रमाण जास्त झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मुंबई महापालिकेत संख्याबळावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेला संख्याबळात काठावरची आघाडी असल्यामुळे महापौरपदासाठी दोन्ही पक्ष प्रत्येक संख्याबळासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. ठोंबरे यांच्या निधनामुळे आता शिवसेनंचं संख्याबळ एकाने कमी झालं आहे.
COMMENTS